
खबरदार, वातावरण बिघडवाल तर… भोंग्यांबाबत पोलीस आयुक्तांचा नविन आदेश…
नाशिक (प्रतिनिधी): मशिदींवरील भोंगे न काढल्यास मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यात धार्मिक वातावरण तापले आहे.
“मशिदीवरील भोंगे काढा नाहीतर त्यांच्या समोर हनुमान चालीसा लावू”, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
मात्र नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी विनापरवाना भोंगे तसेच हनुमान चालीसा पठणासाठी नाशिक शहरासाठी थेट आदेशच काढला आहे.
नाशिक शहरात विनापरवानगी भोंगे लावल्यास तडीपार अन्यथा चार महिने तुरुंगवास भोगावे लागणार आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10468,10466,10464″]
नाशिक शहरातील सर्व प्रकारचे भोंगे आणि ध्वनीक्षेपके उतरवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक अथवा अन्य ठिकाणी लाऊड स्पीकर लावता येणार नाही, असं दिपक पांडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अनधिकृत भोंग्यांबाबत परिपत्रक जारी करणारं नाशिक हे राज्यातील पहिलं शहर ठरलंय. सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यांच्या परवानगीसाठी ३ मे २०२२ पर्यंत नियमानुसार रीतसर परवानगी घेणे आवश्यक राहील.
त्याचप्रमाणे मशिदीपासून शंभर मीटरच्या आत पाच वेळेच्या नमाजाच्या वेळी कुणालाही भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणता येणार नाही. अन्यथा नाशिक शहरात आता भोंगे लावल्यास चार महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
भोंगे लावण्याच्या नावाखाली कोणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना थेट 4 महिने तुरुंगवासाची शिक्षा याशिवाय शहरातून 6 महिन्यासाठी तडीपार करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी घेतल्याने हा निर्णय चर्चेचा विषय बनला आहे.
त्यामुळे आता मनसे काय भूमिका घेणार याचीही चर्चा सुरु झाली आहे. हनुमान चालीसा प्रकरणात नाशिकच्या पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी उशिरा मध्यरात्री आदेश काढत मनसेच्या भोंग्यांना चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमान चालीसा म्हणू इच्छिणाऱ्यांना आता 3 मेपर्यंत पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी मागताना मशिदीपासून शंभर मीटर दूर अंतरावर आणि नमाजाच्या वेळेपूर्वी किंवा नंतर पंधरा मिनिटांचे बंधन यामध्ये लावण्यात आले आहे. तसेच हनुमान चालीसा म्हणताना प्रदूषण महामंडळाचे प्रचलित ध्वनी प्रदूषण नियम पाळावे लागणार आहेत.