आधी बलात्कार, मग जबरदस्ती गर्भपात आणि लग्न मात्र दुसऱ्याच मुलीशी…

नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे अमिष दाखवत एकाने अडीच वर्ष युवतीवर बलात्कार करत गोड बोलून तिचा गर्भपातही केला. मात्र, त्यानंतर त्याने लग्न न करता तिला जातीवाचक शिवीगाळ करत दुसरीचे लग्न केले. याप्रकरणी पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी एकावर बलात्कार व अनुसुचित जाती, जमाती अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

ज्ञानेश्वर सुभाष कोटकर (२५, रा. हिरावाडी, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कोटकर याने पीडित युवतीशी ओळख वाढवली. दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर डिसेंबर २०१७ ते जून २०२० या कालावधीत लग्नाचे अमिष दाखवत वारंवार बलात्कार केला. तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिची फसवणूक करत दुसर्‍या मुलीशी विवाह केला. पोलिसांनी त्याला अटक करत शुक्रवारी (दि.१६) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त प्रदिप जाधव करत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here