नाशिक (प्रतिनिधी) : आज (दि.१६) संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पंचवटी परिसरात तब्बल ५६ रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता पंचवटी भाग हा नवीन हॉटस्पॉट होऊ बघत आहे. फुले नगर आणि जुने नाशिक या भागात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याने हे भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते. त्यापाठोपाठच आता पंचवटी परिसरात सुद्धा एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने सगळ्यांचेच डोळे आता पांढरे झाले आहेत. पंचवटी भागातील संजय नगर, म्हसरूळ, दिंडोरी रोड, क्रांती नगर, पेठ रोड, हिरावाडी, तपोवन या भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुन्हा लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाबाधीतांची संख्या हि प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन करावा का याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. खरं तर यात दोन मतप्रवाह आहेत. एक म्हणजे लॉकडाऊन केलं तर कोरोनाचा संसर्ग थांबेल आणि दुसरा म्हणजे लॉकडाऊन केलं तर चाकरमान्यांचे होणारे हाल.. विशेष म्हणजे ज्यावेळी नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला नव्हता त्यावेळी नाशिकसह संपूर्ण देशात लॉकडाऊन होता आणि ज्यावेळी राज्यात कोरोनाबाधीतांची संख्या वाढत चालली आहे, त्यावेळी मिशन बिगीन अगेन सुरु झालं आहे. आजची अपडेट बघितली तर, आज (दि.१६) संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पंचवटी परिसरात तब्बल ५६ रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता पंचवटी भाग हा नवीन हॉटस्पॉट होऊ बघत आहे. फुले नगर आणि जुने नाशिक या भागात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याने हे भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते. त्यापाठोपाठच आता पंचवटी परिसरात सुद्धा एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने सगळ्यांचेच डोळे आता पांढरे झाले आहेत. पंचवटी भागातील संजय नगर, म्हसरूळ, दिंडोरी रोड, क्रांती नगर, पेठ रोड, हिरावाडी, तपोवन या भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
पुणे, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. स्थानिक राज्यकर्त्यांच्या मते लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्यासाठी एकमेव पर्याय नाही. मग ज्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय त्याचं गणित काय असावं हा सुद्धा एक प्रश्नच आहे. नाशिकमध्ये लॉकडाऊन हा पर्याय नसेल तर मग ठोस उपाययोजना तरी प्रशासनाने करायला हव्यात. परंतु नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून रोज शेकडोने रुग्ण आढळत असूनसुद्धा प्रशासनाला जाग कशी येत नाही? अजून किती दिवस प्रशासन हाताची घडी, तोंडावर बोट ठेऊन कोरोनाचा पराक्रम बघणार आहे असे प्रश्न नागरिक विचारताय !