डॉ. निरज काळे यांनी वाचविले रुग्णाचे प्राण.
नाशिक (प्रतिनिधी): “दोन पावलं जरी चाललं तरी दम लागतो आणि एक वर्षापासून हा त्रास होतोय, पण कोणीही माझं ऑपरेशन करायला तयार नाही ” असं म्हणत प्रशांत गरुड हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. निरज काळे यांच्याकडे आले. त्यांचा २ डी ईकोचा रिपोर्ट बघितला असता हृदयाच्या मुख्य नलिकेच्या तोंडाशी असलेल्या झडपे मध्ये चोकअप आहे (severe aortic stenosis) आणि हृदयाची कार्यक्षमता फक्त १५ टक्के आहे (ejection fraction 15%) असे लक्षात आले. त्यामुळे अनेक हृदय शस्रक्रिया तज्ञांनी शस्रक्रिया करण्यास नकार दिला. गरुड यांनी पुणे व मुंबई येथील हृदय शस्रक्रिया तज्ञांकडे जाऊन देखील सल्ला घेतला, परंतु तेही जोखीम लक्षात घेता शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते, त्यामुळे रुग्ण मानसिक दृष्ट्या अतिशय खचून गेला होता.
डॉ. निरज काळे यांनी रुग्णाची तपासणी करून शस्रक्रिया अतिशय जोखमीची आहे, परंतु अनुभवी डॉक्टर्स ची टीम आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या हॉस्पिटलमध्ये करता येऊ शकते असा सल्ला रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना देण्यात आला. डॉ. निरज काळे यांनी रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना मार्गदर्शन केले आणि रुग्णाची शस्रक्रिया करण्याचे ठरवले.
या शस्रक्रियेत रुग्णाच्या हृदयाच्या झडप बदलण्यात येणार होत्या. रुग्णाचे नातेवाईक देखील तयार झाले आणि शस्रक्रिया पार पडली, शस्रक्रिया यशस्वी झाली परंतु हृदयाची कार्यक्षमता अतिशय कमी असल्याने पहिले 48 तास रुग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर होती रुग्ण २४ तास कोमात होता, नातेवाईकांनी देखील आशा सोडली होती पण डॉ.निरज काळे व टीमने रुग्णावर तब्बल दोन आठवडे उपचार सुरू ठेवले आणि यश हाती लागलं.
आपोलो हॉस्पिटलचे हृदय शस्रक्रिया तज्ञ डॉ.निरज काळे म्हणाले, “अपोलो हॉस्पिटल मधील अद्यावत तंत्रज्ञान , सुसज्ज आयसीयू , अनुभवी डॉक्टरांची टीम तसेच प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ असल्याने अशा प्रकारच्या अति जोखमीच्या शस्रक्रिया यशस्वी होतात ,आज सदर रुग्ण शस्रक्रियेला तीन महिने पूर्ण झाल्यावर सप्तशृंगी गड सुद्धा चढून दर्शन घेऊन आला आहे आणि आपले दैनंदिन काम सुद्धा सुरळीतपणे करत आहे. रुग्ण जेव्हा फेरतपासणी करीत आल्यावर डॉ. निर्मल कोलते यांनी हृदयाची २ डी इको तपासणी केली असता हृदयाची कार्यक्षमता आधी पेक्षा सुधारली आहे आणि बदललेली झडप हि व्यवस्थित काम करत आहे असे लक्षात आले , शस्रक्रिया यशस्वी झाल्या बद्दल मी संपूर्ण अपोलो टीमचे आणि डॉक्टरांचे अभिनंदन करतो.”
रुग्णाच्या पत्नी सौ. आम्रपाली गरुड म्हणाल्या की “आम्ही मानसिकदृष्ट्या खूपच खचलो होतो, माझे पती जिवंत राहतील आशा मला वाटत नव्हती पण आमचा निर्णय योग्य ठरला, डॉ. काळे यांनी आम्हाला खूप धीर दिला आणि योग्य मार्गदर्शन केले म्हणूनच आम्ही शस्रक्रियेची जोखीम घ्यायला तयार झालो, डॉ.निरज काळे व अपोलो हॉस्पिटल मधील इतर डॉक्टरांच्या टीमने हि शस्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप ऋणी आहे
अपोलो हॉस्पिटलचे युनिटे हेड अजित झा म्हणाले की “अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ तसेच सुसज्ज ऑपरेशन थिएटर या गोष्टींमुळे अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये अशा प्रकारच्या शस्रक्रिया आम्ही यशस्वीपणे करू शकतो मला याचा अभिमान आहे”.
या अति जोखमीच्या हृदय शस्रक्रिये करता हृदय शास्त्रक्रिया तज्ञ डॉ. निरज काळे, हृदय विकार तज्ञ डॉ. निर्मल कोलते , भूलतज्ञ डॉ.भूपेश पराते , मेंदूविकार तज्ञ डॉ. जितेंद्र शुक्ल, किडनी विकार तज्ञ डॉ. अजय नक्षणे , अपोलो च्या अति दक्षता विभागाचे प्रमुख डॉ.प्रवीण ताजणे तसेच अतिदक्षता विभागातील सर्व डॉक्टर्स व परिचारिकांनी अथक परिश्रम घेतले.