नाशिक: सराफ व्यावसायिकाचे अपहरण करत तलवारीचा धाक दाखवून ७ लाख लुटले

नाशिक: सराफ व्यावसायिकाचे अपहरण करत तलवारीचा धाक दाखवून ७ लाख लुटले

नाशिक (प्रतिनिधी): सराफ व्यावसायिकाचा पाठलाग करत दुचाकीवरून त्याचे अपहरण करण्यात आले व जंगलात नेऊन तलवारीचा धाक दाखवत त्याच्याकडून दुकानाची चावी हस्तगत करून दुकानातील सोन्याचे दागिने आणि रक्कम असा सात लाखांचा ऐवज लुटण्याचा धक्कादायक प्रकार मुंबई-आग्रारोडवरील स्वराजनगर परिसरातील जंगलात उघडकीस आला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

या लुटारूंनी सराफाला बंधक बनवत दुकानातील दागिने लुटून नेल्याची तक्रार सराफ व्यावसायिकाने पोलिसांत दिली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आ.हे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि संजय बेरा (रा. गणेशवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंबड येथील सराफी दुकानातून दुचाकीने घरी जात असताना अनोळखी दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या तीन संशयितांनी दुचाकी थांबवली. बळजबरीने त्यांच्या दुचाकीवर बसवून ओरडल्यास ठार मारण्याची धमकी देत स्वराजनगर परिसरातील जंगलात घेऊन गेले. जंगलात दाट झाडीत नेऊन तलवारीचा धाक दाखवत तलवारीच्या मागील बाजूने मारहाण केली. खिशातील रक्कम आणि बॅगमधील ३२ ग्रॅम वजनाचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

एका संशयिताने खिशातून दुकानाची चावी घेत दोघांनी तेथेच बंधक बनवत एक चावी घेऊन दुचाकीने दुकानात गेला व दुकानात विक्रीसाठी ठेवलेले ७२.५ ग्रॅमचे दागिने लुटले. याबाबत पोलिसांत तक्रार केली तर तुला मारून टाकू अशी धमकी देत दुचाकीवरून निघून गेले. बेरा यांनी काही नागरिकांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here