नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा त्र्यंबकेश्वरमध्ये स्थित महादेव मंदिर उघडण्यासाठी अजून प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. तसेच गेल्या चार महिन्यांपासून त्र्यंबकेश्वर मध्ये लॉक डाऊन सुरूच आहे. त्यामुळे यावर्षी श्रावणातही मंदिर बंद असल्याने भाविकांचा हिरमोड होणार आहे. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील रोज, सोमवार किवा तिसऱ्या सोमवारी ब्रम्हगिरीच्या फेरीसाठी यंदा परवानगी मिळणार नाही.
दरवर्षी श्रावण महिन्यात दर सोमवारी त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी लांबच लांब रांग असते. तसेच ब्रम्हगिरीच्या फेरीसाठी सुद्धा दर वर्षी गर्दी असते. परंतु यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता त्र्यंबकेश्वर शहर चाल महिन्यांपासून लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रथमच यंदाच्या श्रावणाची सुरुवात भाविकांविना होणार आहे.