कोरोनाची भीती होणार आता दूर; विशेष हेल्पलाईन नाशिकमध्ये सुरु; जाणून घ्या नंबर्स

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे समाज कधी नव्हे एवढा चिंताक्रांत बनला आहे. आपल्यालाही स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी वाटणे स्वभाविक आहे. पण या काळजीचे रूपांतर अवास्तव चिंता किंवा भीतीमध्ये होत असेल तर ते मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. झोप न येणे, एकटे वाटणे, निराश वाटणे, आयुष्य संपविण्याची मनात इच्छा होणे, हदयात धडधड सुरु आहे असे वाटणे, सध्या यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या बाबींचे वेळीच निराकरण, समुपदेशन करण्यासाठी नाशिक महापालिका, भोसला कँम्पस आणि नाशिक सायकॅट्रीक सोसायटीने पुढाकार घेतला आहे.

या तिन्हीमध्ये एका बैठकीत नुकताच करार झाला. ‘मनोधर’च्या माध्यमातून अशा व्यथीत व्यक्ती, कुटूंबाना हेल्पलाईद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. हा करार महापालिकेकडून आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र त्र्यंबके,  नाशिक सायकॅट्रीक सोसायटीचे डॉ. उमेश नागापूरकर आणि भोसला मिलीटरी कॉलेजचे प्राचार्य डॉ.यु.वाय.कुलकर्णी यांनी मंजूर केला. तीन महिन्यांसाठी असणारा हा करार भविष्यात गरजेनुसार पुढे वाढू शकतो अथवा संपुष्टातही येऊ शकतो,  मात्र हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असेल.

या करारात तिन्ही संस्थाची जबाबदारी निश्चित करण्यात येऊन कामाचे सुक्ष्म नियोजन झाले. त्यानुसार महापालिका आरोग्य विभाग हा या कार्यात सहभागीं होणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देणे, लोकांच्या प्रबोधन, प्रोत्साहनासाठी नाशिक सायकॅट्रीक सोसायटीच्या मदतीने मोठ्या संखयेने छोटे छोटे ध्वनीसंदेश तयार करणे, ध्वनी-चित्रफितसंदेशातून माहिती पोहचविण्याचे काम करणे, याशिवाय कोरोनाग्रस्त रूग्य, वैयक्तीकत्रस्त झालेले किंवा आढळलेल्या नमून्यांमुळे तणावाखाली असलेल्यांना नाशिक सायकॅटीक सोसायटीकडे (मानसोपचार तज्ञ, डॉक्टर) पाठवणे, समाजात तणावरहित आणि आरोग्यसाठी पोषण उत्साही वातावरण तयार करण्यासाठी काम करण्याचे ठरले.

———

हेल्पलाईनद्वारे महत्वपूर्ण मदत

भोसला कॅम्पसचाही या प्रकियेत प्रमुख सहभाग असेल. मानसिक आणि भावनिकदृष्टया त्रस्त असणाऱ्यांना ओळखून त्यांना सेल, हेल्पलाईनद्वारे त्वरीत मनुष्यबळ उपलब्ध करूने देणे, सेल आणि हेल्पलाईनद्वारे आलेल्या सर्व बाबींच्या नोंदी ठेवणे, रूग्णांची गरज व आवश्यकतेनुसार नाशिक सायकॅट्रीक सोसायटीकडे पाठवणे त्तात्काळ सेवेसाठी लोकांना आवाहन करून वाहने उपलब्ध करून देणे या कामांबरोबरच समन्वय साधण्याची महत्वपुर्ण जबाबदारी भोसला कँम्पसवर देण्यात आली य़ाहे. या तिन्ही संस्थांद्वारे सेल,हेल्पलाईनच्या माध्मातून आगामी काळात नाशिककरांना तात्काळ मदत,समुपदेशाबरोबरच प्रबोधन,जनजागृतीचे महत्वपूर्ण काम होईल. यामुळे कोरोनाच्या या भयावह परिस्थितीत नाशिककरांना निश्चित दिलासा मिळेल यात शंका नाही.

जाणून घ्या काय आहेत नंबर्स: 9607532233 आणि 9607735132

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790