फरार लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर अखेर एसीबीच्या अटकेत!

फरार लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर अखेर एसीबीच्या अटकेत!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकची लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकरला एसीबीने अटक केली आहे. वैशाली झनकरला आठ लाखांची लाच घेण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाला गुंगारा देत झनकर फरार होती.

कल्याण आणि नाशिक जिल्ह्यात झनकरकडे कोट्यवधींची मालमत्ता आढळली आहे. झनकरच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेले बहुतेक सर्व निर्णय संशयाच्या भोव-यात आहेत. सर्व प्रकरणांची चौकसी करण्याची मागणी केली जाते आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- ठाणे येथील एका शिक्षण संस्थेकडून 8 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी वीर यांच्यासह शिक्षक पंकज दशपुते आणि वाहनचालक ज्ञानेश्वर येवले भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: एमडी ड्रग्जमाफिया ललित पाटीलसह ४ पेडलर्स नाशिक पोलिसांच्या ताब्यात !

नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीर जनकर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलीये. ठाणे लाचलुचपत विभागाला गुंगारा देत  फरार झालेल्या या शिक्षणाधिकारी आठ लाख रुपये लाच घेताना त्यांच्या ड्रायव्हर आणि एका शिक्षकासह छाप्यात रंगेहाथ सापडले.. त्यांच्या नावे मुरबाड, कल्याण रोड, सिन्नर नाशिक गंधारे आणि गंगापूर रोड अशा चार ठिकाणी फ्लॅट आहेत तर कल्याणमध्ये मोठी गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आढळून आल्याने लाचलुचपत विभागाने त्यांच्याबद्दल काही तक्रारी असल्यास नागरिकांना आवाहन आवाहन केले आहे.

हे ही वाचा:  Breaking: गंगापूर रोडला ऑक्सिजन सिलेंडरचा मोठा स्फोट; आजूबाजूच्या घरांच्या काचाही फुटल्या

नाशिकच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर आठ लाखांची लाच घेताना फरार झालेले असतानाच नगर जिल्ह्यात एका प्राचार्याला दीड लाखाची लाच घेताना अटक करण्यात आलीये. बी एच एम एस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र इंटर्नशिप केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी श्रीरामपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. या महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य बापूसाहेब हरिश्‍चंद्र व लिपिक भारती बापूसाहेब इथापे यांना अटक करण्यात आलीये. या दोन घटनांमुळे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण विभागात सुरू असलेला भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे हे समोर आलेय.

हे ही वाचा:  नाशिक: नाशिक-पुणे‎ रोडवरील 24 वृक्षतोडीला हिरवा कंदील; 120 झाडे लावण्याची अट

नाशिकच्या ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा नक्की वाचा:
१० ऑक्टोबरची यूपीएससी परीक्षा देता येणार आता नाशिकमधून!
नाशिक जिल्ह्यात निर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे लाँचिंग
बांधकाम व्यावसायिक कोल्हे यांची मोक्काविरोधातील याचिका फेटाळली
कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये मिळणार का ? व्हायरल मेसेजचं सत्य..
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १३ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790