चिंताजनक: पोर्तुगालहून नाशिकला आलेले दोघे कोरोनाबाधित
नाशिक (प्रतिनिधी): शहरात सोमवारी (दि. २७) सायंकाळी ८ वाजता पोर्तुगालहून आलेले पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
त्यांचा ओमायक्रॉन संदर्भातील जिनोम सिक्वेन्सिंग करीता ‘स्वॅब’चा नमुना पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठविला आहे.
यामुळे नाशिक महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आफ्रिकेतून आलेल्यासह १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह:
१२ डिसेंबर रोजी पश्चिम आफ्रिकेतील ‘माली’ या देशातून नाशकात आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे वैद्यकीय विभाग धास्तावला होता. या रुग्णाच्या संपर्कातील हॉटेलमधील जवळपास बारा व्यक्तींचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले होते. या रुग्णाला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती अत्यंत चांगली होती मात्र संपर्कामध्ये भाषेची अडचण होत होती. दरम्यान सोमवारी या रुग्णाचा पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठवलेला ओमायक्रॉनचा ‘जिनोम सिक्वेन्सिंग’चा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे वैद्यकीय विभागाने सुटकेचा निश्वास सोडला होता. संबंधित रुग्णालय खासगी रुग्णालयामध्ये पाठवण्यासाठी सोडण्यातही आले.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
दुर्दैवी घटना: नाशिकमध्ये पाटात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू
धक्कादायक: नाशिकला या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू…