नाशिक शहर: गाद्यांच्या दुकानाला आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल

नाशिक (प्रतिनिधी): पाच दिवसांपूर्वी शहरातील जुने नाशिक परिसरामधील भद्रकाली भागात एका जुन्या घराला आग लागल्याची घटना घडली होती. अशातच आता ही घटना ताजी असतानाच महापालिका प्रभाग क्रमांक २३ मधील एका गादीच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली असून एकच खळबळ उडाली आहे….

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा चौफुली खोडे नगर कॉर्नर येथे हे एक गादीचे दुकान असून त्यास आज अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

दरम्यान, ही आग भीषण असल्याचे समजते असून अग्निशमन दलाच्या तब्बल दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून आग नियंत्रणात आलेली नसून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790