नाशिक: शहरातील ‘या’ होलसेलच्या दुकानातून लाखो रुपयांच्या खाद्यतेलाची चोरी
नाशिक (प्रतिनिधी): सोनं, चांदी, पैसे, मोटार सायकल चोरीच्या घटना आपण सर्वांनी ऐकल्या आहेत.
यानंतर युक्रेन रशियाच्या युद्धामुळे इंधनाचे दर वाढण्याची भीती असल्याने डिझेल चोरीचे प्रकार सुद्धा घडले आहेत.
मात्र आता चोरांनी चक्क खाद्य तेलावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आलाय.
नाशिक शहरात एक लाख सात हजार रुपये किमतीचे खाद्य तेलाचे डबे चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
शरदचंद्र पवार मार्केट मधील श्रीराम ट्रेडर्स या दुकानात ही चोरी झाली आहे. याप्रकरणी महेश गोविंदजी ठक्कर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरदचंद्र पवार मार्केटमध्ये श्रीराम ट्रेडर्स हे होलसेल दुकान आहेत. या दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोर दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूमच्या खिडकीचे गज कापून आत घुसले.
बाथरूमच्या आता गेल्यानंतर बाथरुमाचा दार तोडून चोरट्याने गोडाऊन मध्ये प्रवेश केला. आणि आतमध्ये ठेवलेले अपटेक कंपनीचे १५ लीटरचे ४ डबे, फोर्च्युन सनफ्लावर तेलाचे १५ लीटरचे १४ डबे, मुरली सोया तेलाच्या एका बॉक्समध्ये १ लिटरच्या १० पिशव्या असलेले ४४ बॉक्स, स्वदेशी शेंगदाणे तेलाच्या एक लिटरच्या पिशव्या असलेले ४ बॉक्स असा एकूण एक लाख, ०७ हजार रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.
- नाशिक: पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा ‘या’ रिसॉर्टवरील हुक्का पार्टीवर छापा
- नाशिक: पैसे तिप्पट करून देण्याचा बहाणा करून ७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला अटक
- नाशिक शहरातील या भागांत मंगळवारी (दि. १५ मार्च) व बुधवारी पाणीपुरवठा बंद