नाशिक: वाहतूक विभागाच्या महिला कर्मचाऱ्याशी घातला वाद.. कोर्टाने दिली ही शिक्षा..

Job: Require Business Development Executive For Nashik Calling.

नाशिक: वाहतूक विभागाच्या महिला कर्मचाऱ्याशी घातला वाद.. कोर्टाने दिली ही शिक्षा..

नाशिक (प्रतिनिधी): वाहतूक विभागाच्या महिला कर्मचाऱ्याला अरेरावी करत तुझी वरिष्ठांकडे तक्रार करेल अशी धमकी देणाऱ्या आरोपीला सोमवारी (दि. १५)न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी ३००० रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा ठोठावली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गोविंदनगर येथील संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाकडून पूरग्रस्तांसाठी ५२ हजारांचा धनादेश जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द

अभियोग कक्ष विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०१२ रोजी १२ वाजता सीबीएस सिग्नल येथे वाहतूकच्या कर्मचारी वैशाली वानखेडे या रहदारी नियंत्रण कर्तव्यावर असताना आरोपी दुचाकी चालक गुलाम मुसा शेख रा. टाकळीरोड हा दुचाकी एमएच १५ बीएच २८१५ शालिमारकडे वेगाने जात असताना त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.

आरोपीने अरेरावी करत मी तुमची वरिष्ठांकडे तक्रार करतो अशी धमकी दिली. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन हवालदार एस. एम. सोनवणे यांनी सबळ पुरावे गोळा करत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार, पंच आणि तपासी अधिकारी यांच्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा आणि ३००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाकडून आर. वाय.सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मतदानासाठी कामगारांना आज मिळणार भरपगारी सुट्टी, सवलत- कामगार उप आयुक्त विकास माळी

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9072,9064,9055″]

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here