नाशिक: वर्दळीच्या ठिकाणी खरेदी करणे एका महिलेला पडलं चांगलच महागात !
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात भुरट्या चोऱ्यांचं सत्र काही थांबत नाहीये.
असाच अनुभव एका महिलेला आला आहे.
नाशिकच्या शालिमार परिसरात नेहमी गर्दी असते या ठिकाणी एक महिलेला गाड्यावरील वस्तू खरेदी करण्यासाठी गेली असता तिचा 96 हजाराचा ऐवज लंपास झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सविता रऊसाहेब देशमुख वय 40 वर्ष राहणार शिवगंगा रो हाऊस, श्रमिक नगर सातपूर, या रविवारी दुपारी गावात खरेदीसाठी आल्या होत्या.
- नाशिक: तलवार दाखवून घरात धुडगूस घालणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड
- नाशिक: एनडी पटेल रोडवर डांबराने भरलेला ट्रक उलटला; एक मजूर जखमी
दुपारी चार वाजता शालिमार चौकातून जात असताना परिसरात गाड्यावर कपडे खरेदीसाठी गर्दी दिसली. ही गर्दि बघून सविता देशमुख यांचा खरेदीचा मोह आवरला गेला नाही. त्याही गाड्यावरील वस्तू बघण्यासाठी गेल्या. ह्या गाड्याजवळ मोठी गर्दी होती. ह्या गर्दीचा फायदा चोरट्यानी घेतला. सविता देशमुख ह्या कपडे खरेदी करत असताना चोरट्यानी त्यांच्या पर्समधून सोन्याचे गंठण तसेच एक हजार रुपये असा 96 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सविता देशमुख यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.