नाशिक: रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने प्रवाशाला मा’र’हा’ण करून लुटले…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते विजय ममता स्टॉप असा रिक्षाने प्रवास करत असतांना रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने ला’थाबु’क्क्यां’नी एकास मा’र’हा’ण करत तब्बल ३० हजार रुपयांचा ऐवज लुबाडल्याची घटना घडली आहे.
याबाबत नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिलक तीरुमणी (वय:२४, राहणार तामिळनाडू) हे नाशिक रोड रेल्वे स्टेशन ते विजय ममता स्टॉप असा रिक्षाने प्रवास करत होते. मुक्तिधाम रोडवर रिक्षात शेजारी बसलेली एक अनोळखी व्यक्ती व रिक्षाचालकाने संगनमताने तिलक तीरुमणी यांना ला’था’बु’क्क्यां’नी मा’र’हा’ण करून डोक्याचे केस ओ’ढून ज’ख’मी केले. याबाबत तक्रार दिल्यास तुला मा’रू’न टाकू अशी ध’म’कीही दिली. आणि प्रवाशाचा १५ हजारांचा मोबाईल, १५ हजारांचे मशिनरी टेस्टिंग कंट्रोल युनिट, ५०० रुपये रोख असा एकून ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक शहरात गुरुवारी (दि. २ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !
नाशिकच्या सिडकोमध्ये तरुणाचा खू’न; लागोपाठ दुसरी घटना