नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर ट्रक आणि कंटेनरमध्ये धडक
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर ट्रक आणि कंटेनर मध्ये आज (दि. २७ ऑक्टोबर) रोजी सकाळच्या सुमारास जोरदार धडक होऊन अपघात झाला.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिक शहरात शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर सकाळी ट्रक आणि कंटेनर यांची धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक आणि कंटेनर दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झाले आहे. असं असलं तरी सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे मुंबई कडून धुळ्याला जाणाऱ्या दोन्ही बाजू बंद करावी लागली होती व फ्लायओव्हरखालून ही वाहतूक वळवण्यात आली होती. तर अवजड वाहनं, शहरातील रस्त्यावरून जात असल्यानं काही काळ मोठी वाहतूक कोंडी देखील झाल्याचे दिसून आले होते.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: शालीमार परिसरात भरदिवसा महिलेची २ लाखांची रोकड हिसकावून चोरट्यांचा पोबारा
भद्रकाली परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक; १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त