
नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर-घोटी महामार्गावर लोणारवाडी परिसरात दोन बोलेरो, एक पिकअप व एक दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात झाला.
ही घटना शुक्रवारी (ता. 18) रात्रीच्या सुमारास घडली.
यात दोन वाहनांचा चक्काचूर झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
सिन्नरकडून घोटीच्या दिशेने जाणारी पिकअप (MH-15-SV-4193) लोणारवाडी शिवारात आली असता समोरून येणाऱ्या बोलेरो (MH-15-CT-7632) यांच्यात धडक होऊन पिकअपच्या पाठमागे चाललेल्या दुसऱ्या बोलेरो (MH-15-DC-1441) ला जोरदार धडक बसली.
या अपघातात एका मोटारसायकलला धडक बसली. अपघातात पिकअपची एक बाजू घासली गेली तर दोन्ही बोलेरोंच्या पुढील बाजुंचा पुर्णपणे चक्काचूर झाला. अपघात दोन्ही बोलेरोमधील 4 जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने मोटारसायकलस्वार व पिकअप चालक थोडक्यात बचावले.
स्थानिकांनी तात्काळ मदत करत जखमींना वाहनांतून बाहेर काढले. जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात एका बोलेरोची पुढील व मागील बाजूचा चक्काचूर होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या नळीत ती फेकली गेली. तर दुसरी बोलेरो व पिकअप भररस्त्यात पडल्याने बराचवेळ महामार्गावर वाहतुक खोळंबली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली.