नाशिक: बिल्डरला ED ची धमकी देऊन ५० लाखांची खंडणी मागणाऱ्याला चार तासांत अटक !

नाशिक: बांधकाम व्यावसायिकास ED ची धमकी देऊन ५० लाखांची खंडणी मागणारा 4 तासात जेरबंद

नाशिक (प्रतिनिधी): बांधकाम व्यावसायिकास ईडीची धमकी देऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्यास क्राईम ब्रांच युनिट १ ने अटक केली आहे.

सदर संशयित आरोपी हा बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफीसमध्ये काम करत होता.

यावेळी त्याने ऑफीसच्या कॉम्प्यूटरमधून महत्वाचा डाटा चोरी केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: RTO कडून 89 डम्पर वाहनांवर 6.5 लाख रूपयांची दंडात्मक कारवाई

आणि त्या डाटाच्या आधारे बांधकाम व्यावसायिकास धमकाविण्यास सुरुवात केली.

याबाबत समीर सोनवणे यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी मारोती रमेश खोसरे (वय: ३५) हा सोनवणे यांच्या ऑफिसमध्ये कामाला होता. त्यावेळी त्याने ऑफिसमधील कॉम्प्यूटरमधून महत्वाचा डाटा चोरी केला. आणि त्याद्वारे सोनवणे यांना ईडीकडे तक्रार करून बदनामी करण्याची धमकी दिली. त्या बदल्यात ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. २५ जुलै रोजी त्यापैकी ५ लाख रुपयांची खंडणी त्याने घेतली सुद्धा. आणि अजून उरलेल्या रकमेची मागणी करू लागला. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्ष राहावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

त्यानंतर क्राईम ब्रांचच्या युनिट १ ने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सदर संशयित आरोपी सातपूरच्या शिवाजी नगर परिसरात असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला सापळा रचून खोसरे याला चार तासात अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी खोसरे याच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी हस्तगत केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790