नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालिकेचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील धुमोडी या गावात ही घटना घडली आहे.

नागरिकांनी बाबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिमकार्ड गैरवापराच्या नावाखाली वृद्धाची १९ लाखांची ऑनलाइन फसवणूक

अधिक माहिती अशी की, एकनाथ वाघ हे त्यांच्या कुटुंबियांसोबत तालुक्यातील धुमोडी येथे राहतात.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”11057,11053,11050″]

सोमवार (4 जुलै) ला संध्याकाळी त्यांची मुलगी ऋचिता एकनाथ वाघ ही घराच्या अंगणात खेळत होती. मात्र 7 वाजेच्या सुमारास रुचीताचा आवाज न आल्याने तिला बघण्यासाठी तिची आई बाहेर आली. अंगणात रुचीता न दिसल्याने आई घाबरली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: खुनाचा प्रयत्न व दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन फरार संशयित अटकेत

घटनेची माहिती जवळच्या नागरिकांना कळवली असता रुचीला बिबट्याने पकडून नेल्याचे शंका व्यक्त करण्यात आली. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे पथक धुमोडी येथे दाखल झाले. परिसरात पाहणी केली असता वाघ कुटुंबाच्या घरापासून दीड किलोमीटर झाडात रुचीचा मृतदेह मिळून आला. वन विभाग बिबट्याचा शोध घेत आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर परिसरात पिंजरे लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790