नाशिक: त्र्यंबकरोडवर भरधाव कारने दिलेल्या धडकेत सात वर्षीय बालक जखमी

नाशिक: त्र्यंबकरोडवर भरधाव कारने दिलेल्या धडकेत सात वर्षीय बालक जखमी

नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडवरील विकास कॉलनी भागात भरधाव कारने दिलेल्या धडकेत सात वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेत बालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मर्सडीज कारचालक महिले विरोधात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. श्रीश महेश निगळ (रा.यूएस अ‍ॅलीगन्स अपा.विकास कॉलनी) हा बालक जखमी झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

श्रीश निगळ हा गेल्या बुधवारी (दि.२५) आपल्या घर परिसरात खेळत असतांना हा अपघात झाला होता. कॉलनीतून भरधाव जाणा-या एमएच १५ इएक्स २७०० या मर्सडीज कारने त्यास जोरदार धडक दिली होती. या अपघातात त्याच्या डाव्या पायास फॅक्चर झाले असून डोक्यासही गंभीर दुखापत झाली आहे. श्रीश निगळ याच्यावर उपचार सुरू असून याप्रकरणी वडिल महेश निगळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालक महिलेविरोधात पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790