नाशिक: तुरुंगातून बाहेर येताच दिराने केला भावजयीचा खून

नाशिक (प्रतिनिधी): बुधवारी (दि.३) रात्री ११ वाजेदरम्यान किरकोळ कारणातून दिराने धारदार चाकूने ३० ते ३५ सपासप वार करत भावजयीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोर दिर फरार झाला असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: एम.डी. ड्रग्ज विक्री प्रकरणी दोघांना अटक; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई !

पूजा संदिप आंबेकर (वय २७, रा. संत कबीरनगर, महात्मानगर, नाशिक) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. संतोष विष्णू आंबेकर असे फरार दिराचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष आंबेकर याच्यावर दोन खूनाचे गुन्हे दाखल आहेत. तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तो काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. मृत महिला पूजा आंबेकर पतीपासून काही दिवसांपासून वेगळी राहत होती. दरम्यान, ती दिर संतोष आंबेकरसोबत २० दिवसांपासून खोली भाड्याने घेऊन राहू लागली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: गुजरातमधून नाशिकमध्ये तस्करी; साडेपाच लाखांचा गुटखा जप्त

बुधवारी रात्री ११ वाजेदरम्यान दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. राग अनावर झाल्याने संतोषने पूजावर धारदार चाकूने ३० ते ३५ सपासप वार केले. त्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर संतोष आंबेकर घटनास्थळावरुन पळून गेला. ही बाब गंगापूर पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790