नाशिक: ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावत पळवली कार

नाशिक: ड्रायव्हरच्या गळ्याला चाकू लावत पळवली कार

नाशिक (प्रतिनिधी): कारमधून भाजीपाला खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या चौघांनी कारचालक आणि त्याच्या मित्राला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करून गळ्याला चाकू लावत मारुती अल्टो ८०० कारसह ६०० रुपयांची रक्कम लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे.

आडगाव शिवारात एका हॉटेलजवळ १६ ऑगस्ट २०२० रोजी हा प्रकार घडला होता.

मात्र या प्रकाराबाबत ८ जानेवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संशयित दत्ता कुटे, कल्पेश शिंदे, गणेश शिंदे व त्यांचा एक साथीदार या सर्वांविरोधात आडगाव पोलिसांत सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Offer: Buy Garbage Bags, Medium – 30 bags/roll (Pack of 6)

सागर आगळे (रा. गांधीनगर, कल्याण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित दत्ता कुटे, कल्पेश शिंदे, गणेश शिंदे आणि त्यांचा एक साथीदार यांनी तक्रारदार आगळे यांच्या मित्राची कार (एमएच ०५ डीएस ३०७२) नाशिकला भाजीपाला खरेदी करण्यासाठी भाडेकरारावर ठरवली होती. दत्ता कुटे आणि त्याचे साथीदार कारमधून येत असतांना संशयितांनी मुंबई-आग्रा रोडवर एका हॉटेलजवळ अंधारात कार थांबवण्यास सांगितले. आगळे आणि त्यांच्या मित्राला कारमधून खाली ओढून शिवीगाळ केली व गळ्याला चाकू लावत कारची चावी घेत कार आणि ६०० रुपयांची रक्कम लुटून नेली. सहायक आयुक्त भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: ‘सॉरी मला माफ करा’ अशी चिठ्ठी सोडून चोराकडून चोरीचा मुद्देमाल परत!
नाशिक: उड्डाणपुलावर क्रुझर-कंटेनर अपघातात वृद्धा ठार
धक्कादायक: पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790