नाशिक: कंटेनरमध्ये उडाला भडका… नव्या वीस इलेक्ट्रिक बाइक्स भस्मसात…

नाशिक: कंटेनरमध्ये उडाला भडका… नव्या वीस इलेक्ट्रिक बाइक्स भस्मसात…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील जितेंद्र इ-व्ही येथे दुपारच्या सुमारास इलेक्ट्रिक दुचाकी  कंटेनर मध्ये लोड करत असताना अचानक कंटेनर मधील दुचाकीने पेट घेत भिषण आग लागली .

या आगीत  लाखो रुपयांची तब्बल वीस चार इलेक्ट्रिक बाइक्स जाळून खाक झाल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई

अग्निशमन दलाच्या  अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली.

सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाथर्डी फाटा येथील जितेंद्र ई-व्ही येथे एका कंटेनरमध्ये  (एन एल 01 एन 8174 ) इलेक्ट्रिक बाइक्स लोड करत असताना कंटेनरमध्ये अचानक आगीचा भडका उडाला. बाइक्स उतरविण्यासाठी कंटेनरचा दरवाजा उघडताच आतील बाजूने धुराचे लोट व आगीच्या ज्वाला उठल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थासाठी साधुग्राम, मंडप व्यवस्थेचा आढावा; २०१५च्या कुंभमेळ्यातील अनुभवाचा नियोजनात उपयोग

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10404,10402,10399″]

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कंटेनरमधील वरच्या कप्प्यात असलेल्या वीस बाइक्स पूर्णपणे जळून खाक झाल्या. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.सदर आग विझवण्यासाठी  सिडको चा एक बंब, एमआयडीसीचा एक बंब अशा दोन बंबाच्याच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत उपाययोजना व उत्पन्नवाढीवर भर द्यावा- व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे

आग विझवण्यासाठी   अग्निशमन दलाचे जवान रवींद्र लाड,एन के व्यहवारे, पी जी लहामगे एच डी भालेराव एस बि  शीलावत   यांनी  अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790