नाशिक: अशोकस्तंभावर वाहनावरील ताबा सुटून गाडी शिरली मिठाईच्या दुकानात

नाशिकमध्ये जॉब शोधताय ? इथे क्लिक करा…

नाशिक: अशोकस्तंभावर वाहनावरील ताबा सुटून गाडी शिरली मिठाईच्या दुकानात

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव वेगात असलेल्या चार चाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट अशोकस्तंभावरील मिठाईच्या दुकानात शिरली.

या अपघातात चालक जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या तिघांना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे 4.45 वाजेच्या सुमारास महेश पवार (वय 43) हे आपल्या टाटा झेस्ट (क्र. एम एच 19 सीयू 0849) या गाडीने भरधाव वेगात मेहेर सिग्नल येथून अशोकस्तंभाकडे येत होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्टॉक मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली ६० लाखांची फसवणूक; दोघे रायगडमधून जेरबंद

पहाटे वर्दळ नसल्याने गाडीचा वेग खूप होता. अशोक स्तंभावर येताच गाडीवरील ताबा सुटल्याने तेथील श्याम स्वीटस या दुकानात शटर तोडून गाडी शिरली. या अपघातात दुकानाचे मोठे नुकसान झाले. पहाटे शांतता असल्याने अपघात होताच मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिकांना त्याबाबत समजले. त्यांनी त्वरित अपघाताची माहिती पोलिसांना दिली. दुकानात शिरलेल्या गाडीला अक्षरशः क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या ठिकाणी दिवसा नागरिक व कॉलेजच्या तरुणांची नेहमी गर्दी असते. दिवसा हा अपघात झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: १४ भरारी पथकांची संयुक्त मोहीम; आतापर्यंत ३८ गोवंश जनावरांची सुटका

या प्रकरणी दुकान मालक किसनदास वैष्णव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790