नाशिक: अंघोळीच्या गरम पाण्याने भाजल्याने महिलेचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराच्या विहितगाव येथील गरम पाण्याने भाजलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.
अंघोळीसाठी काढलेल्या गरम पाण्याच्या बादलीवर चक्कर येऊन पडल्याने त्या भाजल्या गेल्या होत्या.
पूजा सुनील जाचक असे त्यांचे नाव आहे.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, पूजा सुनील जाचक वय 28 ह्या विहितगाव येथील बागुलनगर येथे राहतात. रविवारी सकाळी त्यांनी बाथरूम मध्ये अंघोळीसाठी बादलीत गरम पाणी काढले होते. मात्र त्यांना बाथरूममध्ये अचानक चक्कर आली. चक्कर आल्याने त्या खाली पडल्या. खाली पडल्याने जवळच असलेली गरम पाण्याची बादली सुद्धा उलटी झाली. बादलीत गरम पाणी होते. पाणी जास्तच गरम असल्यानं त्या 60 ते 70 टक्के भाजल्या गेल्या असाव्यात. त्यांना तात्काळ नाशिक रोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.