धक्कादायक! नाशिकमध्ये २१ वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहात आ त्म ह त्या

धक्कादायक! नाशिकमध्ये २१ वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहात आ त्म ह त्या

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याने आ त्म ह त्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

यामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे….

गौरव रमेश बोरसे (२१) असे आ त्म ह त्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्लू पार्श्वभूमीवर कुक्कुटपालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

आज (दि. २२) सकाळी गौरव बोरसे राहत असलेल्या शेजारील रूममध्ये राहणारा एक मुलगा इस्त्री मागण्यासाठी गौरवकडे गेला होता. त्याचवेळी वसतिगृहात घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला.

गौरवने नैराश्यातून आ त्म ह त्या केल्याची हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. गौरव हा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. तो आपल्या सीए असलेल्या मामाकडे फावल्या वेळात काम करत असल्याचे समजते. त्याने काही चिठ्ठी लिहून ठेवली आहे का, याची पडताळणीही पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे होस्टेल परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते ध्वजवंदन

हा प्रकार उघडकीस येताच याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान, हा प्रकार केटीएचएम कॉलेजच्या वसतिगृहात घडल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी अधिक तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790