नाशिक: तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलवलंय”, आधी जबरदस्तीनं गाडीत बसवलं, नंतर..

”तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलवलंय”, नाशिकमध्ये लॉजवर नेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये पुन्हा एकदा विनयभंगाची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला बळजबरीनं लॉजवर नेऊन विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातली ही घटना आहे.

🔎 हे वाचलं का?:  नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात फ्लेमिंगो पाहुण्यांचे आगमन; गुलाबी लाटेने जलाशयाला चढली विलक्षण झळाळी !

शाळेत जाणाऱ्या मुलीला तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलावलं असं सांगून आरोपीनं कारमध्ये बसवलं. मुलगी कारमध्ये बसल्यानंतर आरोपीनं कार लॉजवर नेली आणि तिथं तिच्यावर अतिप्रसंग केला. पीडित मुलीनं घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतापलेल्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपी दानिश खानला मारहाण केली आहे. सध्या आरोपी दानिशवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: RTO कडून 89 डम्पर वाहनांवर 6.5 लाख रूपयांची दंडात्मक कारवाई

आरोपी दानिश खान विरोधात काल संध्याकाळी मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिडीत मुलीच्या कुटुंबियांचा ओळखीतील व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790