त्याच्यावर सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहे.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक (प्रतिनिधी): जळता फटाका अंगावर पडल्याने नाशिकच्या इंदिरानगर भागात एक ७ वर्षीय मुलगा गंभीर भाजला आहे.
नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील पांडवनगरीत येथे राहणाऱ्या शौर्य लाखोडे या 7 वर्षाच्या मुलाला फटाके फोडणे अंगाशी आलंय..
शौर्य हा त्याच्या मित्रासोबत फटाके फोडत होता. अशातच मित्राने फेकलेला जळता फटाका हा बाजूला उभा असलेल्या शौर्यच्या अंगावर जाऊन पडल्याने त्याच्या कपड्यांनी पेट घेतला. या घटनेत तो मोठ्या प्रमाणावर भाजला गेला. ही बाब लक्षात येताच शौर्यच्या घरच्यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यावर अधिक उपचार सुरू आहेत. त्यामुळे लहान मुलं फटाके फोडत असतांना पालकांनी स्वत: लक्ष देणं गरजेचं आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: दीड वर्षाच्या मुलीवर घरीच उपचार करणं तिच्या जीवावर बेतलं: पित्याला अटक
ट्रकच्या धडकेनं टँकर पलटी, आगीचा उडाला भडका, 2 जणांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २५ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू