नाशिक: चक्क पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या ट्रकमधून करत होते डिझेलची चोरी..

नाशिक: चक्क पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या ट्रकमधून करत होते डिझेलची चोरी..

नाशिक (प्रतिनिधी): पेट्रोल पंपावरील ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या दोन सराईतांना आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने हिरावाडीत अटक केली. चंद्रबहादूर भीमबहादूर सोनार (रा. श्रीरामपूर) व सागर दत्तात्र्येय गरड (रा. जोशीवाडा, हिरावाडी) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती व विश्वास जाधव (रा. नांदुरनाका) यांच्या तक्रारीनुसार महामार्गावरील ट्रक टर्मिनल्स येथील शहीद पेट्रोल पंपावर १९ रोजी रात्री उभ्या केलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून २३० लिटर डिझेलची चोरी झाली. याबाबत तपासात पथकाचे विजयकुमार सूर्यवंशी यांना संशयित मेडिकल कॉलेज चौफुली येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

हे ही वाचा:  पत्नीच्या अंगावर रॅाकेल ओतून पेटती काडी टाकणा-या नव-याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा

त्यानुसार सापळा रचत कारचा (एमएच ०६ एझेड २३०१) चालक चंद्रबहादूर सोनार याच्या चौकशीत हिरावाडीतील सागर गरडच्या मदतीने डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने दोघांना अटक केली. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख, हेमंत तोडकर, सूर्यवंशी अादींच्या पथकाने ही कारवाई केली.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790