नाशिक: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण
नाशिक (प्रतिनिधी): साथरोगांच्या काळात व इतर काळातही जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा सतत पुरेसा साठा असावा म्हणून नाशिक जिल्ह्याची वाटचाल ऑक्सिजन स्वयंपूर्णतेच्या दिशेने सुरू आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथील एक हजार एलपीएम क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात झालेल्या या लोकार्पणप्रसंगी आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, नोडल अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे उपस्थित होते. यापूर्वी निफाड उपजिल्हा रुग्णालय येथील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते संपन्न झाले