कालिका पार्कमधील धोकादायक विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी प्रस्ताव तयार करणार

नाशिक (प्रतिनिधी): कालिका पार्कमधील घरांजवळ लोंबकळणार्‍या विद्युततारा भूमिगत करण्यासाठी आज वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी या भागात पाहणी केली. याबाबत प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असे सहाय्यक अभियंता प्रदीप गवई यांनी सांगितले.

उंटवाडीतील कालिका पार्क भागातील रो-हाऊस आणि बंगल्यांच्या गॅलरीलगत ४४० व्होल्टेजच्या लोंबकळणार्‍या विद्युततारा आहेत. यामुळे येथील रहिवाशांच्या जीविताला धोका असून, ते नेहमी भीतीच्या सावटाखाली राहतात.

संभाव्य दुर्घटना होण्यापूर्वीच येथील विद्युततारा भूमिगत कराव्यात, नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करावे, अशी मागणी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी वीज वितरणच्या अधिकार्‍यांकडे अनेकदा केली होती.

हे ही वाचा:  नाशिक: नाशिक-पुणे‎ रोडवरील 24 वृक्षतोडीला हिरवा कंदील; 120 झाडे लावण्याची अट

सहाय्यक अभियंता प्रदीप गवई, वायरमन दीपक शिर्के, किशोर वाघ, लाईनमन गोकुळ सोनवणे यांनी बुधवारी, १३ ऑक्टोबर २०२१ रोजी या भागात पाहणी केली. सात स्पॅन अर्थात गाळे, ट्रान्सफॉर्मर, डीपी यांची पाहणी करून मोजमाप केले. सुमारे अडीचशे ते तीनशे मीटर विद्युततारा भूमिगत कराव्या लागणार आहेत, असे त्यांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येईल, तो अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे, असे प्रदीप गवई यांनी सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: मिरची चौक येथील उड्डाणपुलासाठी ५० कोटी मंजूर; कोंडी फुटणार !

यावेळी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, सुलोचना पांडव, विनोद पोळ, बाळासाहेब दिंडे, नितिन सोनजे, शैला देशमुख, छाया चौधरी, सरला सोनवणे, विमल हिरे, राजश्री गांगुर्डे, सुनिता येवले, मनिषा सोनजे, कांता पोळ, आशालता काळे, सुनिता गाढवे, संगिता पवार, भाविका ठाकरे, संगिता थोरात, रमेश थोरात, अशोक गाढवे, सोमनाथ काळे, सोनू देशमुख, आकाश ठाकरे, पप्पू कदम, पंकज काळे यांच्यासह रहिवाशी हजर होते. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी रहिवाशांचे शिष्टमंडळ वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेणार आहे.

हे ही वाचा:  उत्तरेमध्ये हिमवृष्टी, वाऱ्यामुळे राज्यात धुक्याची चादर: उद्यापासून अजून वाढेल थंडीचा कडाका

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790