इर्टीगा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार

इर्टीगा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील देवळा – नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी इर्टीगा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर ता.देवळा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच तर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने रामेश्वर सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला.

हे ही वाचा:  बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिका जखमी

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर येथील ढेबुड मळा शिवारातील हिरे कुटुंबातील चार जण पिंपळगाव (वा.) येथून मोटारसायकलने (एमएच ४१ के ५६६१) शेतावर काम करून घराकडे परतत असतांना नाशिककडून आलेल्या इर्टीगा कारने (एमएच ४३ एएल ३००९) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात या हिरे कुटुंबातील गोपीनाथ साळूबा हिरे (वय ४२ ), मंगलबाई गोपीनाथ हिरे (वय ३५) या पती-पत्नीसह मुलगा गोरख गोपीनाथ हिरे (वय १६) हे जागीच ठार झाले तर जागृती गोपीनाथ हिरे ( वय १८) हिचा मालेगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
महत्वाचे: नाशिक शहरातील या भागांत शनिवार (दि. २०) व रविवार (दि. २१) नोव्हेंबर पाणीपुरवठा नाही

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790