इगतपुरीत गँगवारचा भडका, दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू

इगतपुरीत गँगवारचा भडका, दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील पर्यटन नगरी इगतपुरीत गँगवार चा भडका उडालाय.

यात पूर्ववैमनस्यातून एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी झालाय.

आज (दि. २८ जानेवारी २०२२) सकाळी दोनगटात तुफान राडा झाल्याने इगतपुरी चे नागरिक दहशतीखाली आहेत.

ग्रामीण पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या ह दाखल केल्यायत . सध्या शहरात संचारबंदी लागू करण्यात आलीय तर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आलीय.

संबंधित घटनेमुळे इगतपुरीते नागरिक हे दहशतीखाली आहेत. घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेमुळे गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9851,9829,9841″]

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना कोरोना संकट काळात आर्थिक संकटासह अनेक संकटांना समोरं जावं लागलं. त्यात आता आणखी या गुंडांच्या हैदोसाने त्यांच्यावर दुकानं बंद ठेवण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही मनस्तापाची वेळ आली आहे. पोलीस आतातरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुरळीत करतील का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पोलीस आरोपींना पकडतात का याकडे इगतपुरीच्या नागरिकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790