नाशिक शहरातील या भागात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) पाणी पुरवठा नाही

नाशिक शहरातील या भागात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) पाणी पुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील काही सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) भागात तांत्रिक कारणास्तव पाणीपुरवठा होणार नसल्याचे नाशिक महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी पाण्याचे पूर्वनियोजन करावे.

भवानी माता येथील जलकुंभ येथे रायझिंग मेन क्रॉस कनेक्शन करावयाचे असल्याने प्र.क्र. 30 मधील श्रध्दा विहार, श्रध्दा गार्डन, कलानगर, पांडवनगरी, शर्वरी नगरी, आण्णाभाऊ साठे नगर, मुमताज नगर, वडाळा गावातील उर्वरित भाग तसेच प्र. क्र. 31 मधील म्हाडा कॉलनी, ज्ञानेश्वर नगर इत्यादी भागात सोमवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळ सत्रातील व दुपार सत्रातील पाणी पुरवठा होणार नाही. त्याचप्रमाणे मंगळवार दि. 24 ऑगस्ट रोजी कमी दाबाने होईल तरी सदर भागातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
इथे किरणा मालावर मिळतेय ४० टक्क्यांपर्यंतची सूट.. ऑफर रविवार पर्यंतच (दि. २२ ऑगस्ट) मर्यादित
डॉ. स्वप्नील शिंदेची आ’त्मह’त्या की घातपात? पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो…