नाशिकमध्ये हॉटस्पॉट ठरत असलेल्या जुने नाशिक भागाची मनपा आयुक्तांकडून पाहणी

नाशिक (प्रतिनिधी) :  नाशिक शहरात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढत असून या पार्श्वभूमीवर जुने नाशिक येथील फकीर वाडी या परिसरात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पाहणी केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तसेच प्रभागातील नगरसेवक गजानन शेलार यांच्यासह मनपाचे अधिकारी, वैद्यकीय पथक इत्यादी उपस्थित होते.

नवीन परिसरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने फकीर वाडी,  जुने नाशिक या भागात ही पाहणी केली.

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..

यावेळी, स्थानिक परिसरातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली. परिसरात असलेल्या खाजगी दवाखान्यांना भेट देऊन तेथील डॉक्टरांशी संवाद साधला. त्यांच्याकडे येत असणाऱ्या रुग्णांमध्ये असणाऱ्या लक्षणांची चौकशी केली व याच परिसरातील औषध विक्रेते व्यवसायिकांशी संवाद साधून त्यांच्याकडे होत असणारी औषध मागणी वाढली आहे का,  कोणत्या स्वरूपाचे औषधे नागरिकांकडून खरेदी केली जातात याबाबतची माहिती या विक्रेत्यांकडून घेण्यात आली. परिसरातील कार्यरत अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याशी चर्चा करून घरोघरी जाऊन योग्य पद्धतीने तपासणी करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या.

हे ही वाचा:  नाशिक पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर कोयताधाऱ्यांचा धिंगाणा

नागरिकांचे प्रबोधन होईल असे माहितीपत्रक तयार करून ते घरोघरी पोहोचेल याबाबतची नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुलतान पुरा दवाखाना येथे बाह्यरोग व क्षयरोग तपासणी सुरू करणेच्या दृष्टीने त्याठिकाणी भेट दिली.