मेसचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्याला अटक !
नाशिक (प्रतिनिधी): मेसचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या भामट्याला इगतपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. रोहिदास रामचंद्र भामरे असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.. औरंगाबाद येथे राहणारे खानावळ व्यावसायिक वैभव लडके यांना संशयित आरोपी रोहिदास भामरे याने मेसचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो असे सांगून इगतपुरी येथे बोलावले. यावेळी भामरे आणि लडके यांमध्ये साक्षीदार म्हणून व घटनेतील दुसरा फिर्यादी आकाश प्रल्हाद राठोड हा देखील उपस्थित होता.
वैभव लडके याला आरोपी रोहिदास भामरे याने इगतपुरी कोर्ट परिसरात भेटून बातचीत करत इगतपुरीच्या SBI बँकेत डीडी काढण्याकामी जाण्यास सांगितले, तेव्हा मेस काँट्रॅक्टसाठी आणलेली रोख रक्कम 12 हजार रुपये लडके याने आकाश राठोड याकडे देऊन पूढे निघून गेला. त्यातच आपल्या बोलण्यात अ’ड’कवून आरोपी भामरे याने आकाश कडून 12 हजार रुपयांची रोकड आपल्याकडे घेत,”मी कागदपत्र तयार करतो तू आधारकार्ड ची झेरॉक्स काढून ये “असे सांगत तेथून वैभव लडके आणि आकाश राठोड या दोघांची फसवणूक करत पळ काढला होता..
याबाबत वैभव लडके आणि आकाश राठोड यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती व त्यानुसार इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची सूत्रे फिरवली. गुप्त बतमीदारामार्फत इगतपुरी पोलिसांना आरोपी हा नाशिकच्या अंबड चुंचाळे भागात असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी खात्री करत सापळा रचून ,संशयित आरोपी रोहिदास रामचंद्र भामरे याला अटक केली आहे.
तर अटक केलेल्या भामरे विरोधात अंबड ,सरकारवाडा आणि पिंपळगाव पोलिस ठाण्यात याआधी भा. दं.वि.कलम: 354,323, 420,465,467,471, व नाशिक कोर्ट मध्ये 138 प्रमाणे चार फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे..त्यामुळे अटक केलेल्या रोहिदास भामरे याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे…
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत बुधवारी (दि. ८ सप्टेंबर) पाणी पुरवठा नाही..