महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत बुधवारी (दि. ८ सप्टेंबर) पाणी पुरवठा नाही..

नाशिक शहरातील या भागांत बुधवारी (दि. ८ सप्टेंबर) पाणी पुरवठा नाही..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील काही भागात बुधवारी (दि. ८ सप्टेंबर) रोजी पाणी पुरवठा होणार नसल्याचे नाशिक महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी पाण्याचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पंचवटी विभागाअंतर्गत रामवाडी जलकुंभास पाणीपुरवठा करणारी उर्ध्ववाहीनी जोडणीचे काम (cross connection) करणे आवश्यक आहे. सदरचे काम नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. मार्फत बुधवार ८ सप्टेंबर २०२१ रोजी हाती घेणेत येणार आहे. त्यामुळे,

हे ही वाचा:  नाशिक: प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक कारवाईत २५ हजार रुपयांचा दंड वसूल !

रामवाडी जलकुंभावरुन होणारा प्रभाग क्र.6 मधील रामवाडी परिसर, आदर्शनगर, कौशल्यानगर, बुरकुलेनगर, कोठारवाडी, रामनगर, बच्छाव हॉस्पीटल परिसर, कलाआई मंदिर परिसर, नागरे मळा, क्रांतीनगरचा काही भाग, तळेनगर, उदय कॉलनी काही भाग, मोरे मळा काही भाग, भावबंधन मंगल कार्यालयाजवळील काही भाग इत्यादी परिसरात बुधवार दि. ८ सप्टेंबर २०२१ रोजीचा सायंकाळी (05:00 ते 07:00 वाजेचा) व गुरुवार दि.09 सप्टेंबर २०२१ रोजीचा सकाळचा (05:00 ते 07:00 वाजेचा) पाणी पुरवठा होणार नाही तसेच गुरुवार दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजीचा दुपारचा (05:00 ते 07:00 वाजेचा) पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ७ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
मेसचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्याला अटक !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790