नाशिक हादरलं: सातपूरला भरदिवसा तरुणावर गोळीबार;तिघे हल्लेखोर फरार

NPA GOLD LOAN

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक हादरलं: सातपूरला भरदिवसा तरुणावर गोळीबार;तिघे हल्लेखोर फरार

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील सातपूर येथील कार्बन नाका परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ तरुणावर जिवघेणा हल्ला झाला आहे.

आपापसातील जुन्या वादातून तिघांनी तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केले.

यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून कामगाराला धाक दाखवत त्याच्या दुचाकीने पळ काढला. ही सिनेस्टाईल घटना रविवारी (ता. १९) दुपारी घडली.

हे ही वाचा:  नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट! पाणी काटकसरीने वापरा; महापालिकेच्या सूचना

रविवारी दुपारी तपन जाधव आपल्या चारचाकीमधून (MH 04 EX 5678) प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात संशयित आरोपी आशिष जाधव आपल्या २ साथीदारांसह (MH 15 DM 7639) या वाहनातून येत तपनच्या गाडीला धडक दिली. यानंतर गाडीखाली उतरत त्याच्यावर कोयत्याने वार केले यासह गोळीबार केला. तिघांनी मिळून केलेल्या या हल्ल्यात तपन जाधव आणि राहुल पवार गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयातउपचार सुरु आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: अल्पवयीनांच्या दप्तरात प्राणघातक शस्त्रे; अवैध हत्यार बाळगणाऱ्यांचा सुळसुळाट...

कामगाराची दुचाकी पळवली:

घटनेनंतर धडक बसल्याने आरोपींची गाडी बंद पडली होती. यामुळे त्या मार्गावरुन जाण्याऱ्य़ा एका कामगाराला आरोपींनी थांबवले. बंदूक अन् कोयत्याचा धाक दाखवत त्या कामगाराची दुचाकी (MH 15 FU 7656) घेऊन आरोपींनी घटनस्थळावरुन पळ काढला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates