नाशिक शहर: युवतीस पळवून नेल्याच्या रागातून नातेवाईकांची मारहाण, तरुणाचा मृत्यू

नाशिक शहर: युवतीस पळवून नेल्याच्या रागातून नातेवाईकांची मारहाण, तरुणाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): दोन लग्न झालेल्या तरुणाने १८ वर्षांच्या युवतीला पळवून नेले होते.

याच रागातून युवतीच्या नातेवाइकांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला.

कालिका मंदिरामागील सहवासनगरातील या घटनेप्रकरणी मुंबईनाका पोलिसात युवतीचे दोन भाऊ व नातेवाईकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अवैध सावकार देवरेकडे कोट्यवधींची माया; एसआयटी पथक करणार तपास !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहवासनगरातील सचिन पाटील (३२) याची दोन लग्ने झाली आहेत.

याच परिसरातील युवतीला त्याने गुजरातला पळवून नेले. युवतीच्या नातेवाईकांनी दोघांना नाशिकला आणले व संशयिताला मारहाण केली. मुंबईनाका पोलिसांनी धाव घेत संशयिताला त्याच्या पत्नीच्या ताब्यात दिले. तिने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रविवारी सकाळी सचिन पाटीलचा मृत्यू झाला.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: कंटेनरमध्ये उडाला भडका… नव्या वीस इलेक्ट्रिक बाइक्स भस्मसात…
नाशिक: पोलिस कर्मचाऱ्याचा पत्नीसह कुटुंबावर जिवघेणा हल्ला; सासऱ्याचा मृत्यू
नाशिक: महसूलच्या आंदोलनास पोलिस आयुक्तांनी नाकारली परवानगी

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790