नाशिकच्या अल्पवयीन मुलीला पळविले, पैसे संपल्यावर तिला एकटे सोडून प्रियकराचे पलायन…

NPA GOLD LOAN

तीन महिन्यांनंतर करमाळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी सुखरूप

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या अल्पवयीन मुलीला प्रियकराने पळवून नेले.

मात्र पैसे संपल्यनंतर तिला एकटे सोडून त्याने पलायन केले.

यामुळे तीन महिन्यापासून एकटीच भटकंती करत असलेल्या या मुलीला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले.

आणि नाशिक जिल्ह्यातील तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधून तिला सुखरुप त्यांच्या ताब्यात दिले.

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार

याबाबत करमाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक जिल्ह्यातुन मे महिन्यात प्रेम प्रकरणातून प्रियकराने अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. काही दिवसांतच प्रियकर या मुलीला एकटी सोडून पळाला. ही मुलगी भटकंती करत करमाळ्यात पोहचली. पोथरे नाका येथे नागरिकांना ही मुलगी दिसली. तिची परिस्थिती बघून त्यांनी पोलिसांना माहिती दिली. करमाळा पोलिसांनी मुलीची आसथेवाईकपणे चौकशी करत तिच्या कुटुंबियांचे नाव पत्ता घेत त्यांच्याशी संपर्क साधला. कुटुंबियांनी तत्काळ करमाळा येथे जात मुलीला ताब्यात घेतले. निरीक्षक सूर्यकांत कोकणे, उपनिरीक्षक विनायक माहुरकर, शितल पवार यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गात महत्वाचे बदल !

मुलीने घर सोडतांना घरातून काही रक्कम सोबत नेली होती. प्रियकराने ही रक्कम खर्च केली. पैसे संपल्यानंतर त्याने मुलीला एकटे सोडून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates