नाशिक(प्रतिनिधी) : मुंबईला 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी असलेल्या युसुफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी (दि. २६ जून) मृत्यू झाला आहे.युसुफ मेमनचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे..मात्र मृत्युच्या कारणाची अद्याप पुष्टी होणे बाकी आहे. 2007 साली त्याला दोषी ठरविण्यात आले होते आणि त्याला 2018 मध्ये नाशिक तुरूंगात हलविण्यात आले होते.
युसुफ मेमन हा जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. शुक्रवारी (दि. २६ जून) सकाळी दहाच्या सुमारास दात घासताना तो कोसळला. त्याला तातडीने नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे जेल अधीक्षकांनी सांगितले. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी धुळे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. युसुफ व त्याचा भाऊ इसाक 26 जुलै 2018 पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत होते..!