NC

नाशिक: चोरीच्या दुचाकी विक्री करणारे त्रिकूट अटकेत, ७ गाड्या जप्त

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): चोरी केलेल्या दुचाकींची मालेगाव व परिसरात विक्री करणाऱ्या त्रिकुटाला अटक करण्यात आली. पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने ही कारवाई केली. मोबिन शेख मेहमूद, समीर शहा अख्तर शाह, मोईन हुसेन शेख (रा. मालेगाव) अशी या संशयितांची नावे आहे.

🔎 हे वाचलं का?:  चौथे विश्व मराठी संमेलन: कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून मराठी भाषेत ज्ञान, सेवा व विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार- संतोष साळवी

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे अशोक काकड, नितीन पवार, कुणाल पचलोरे हे कर्मचारी गोदाघाटावरील गौरी पटांगणात गस्तीवर असताना तीन संशयित विनानंबरची दुचाकी घेऊन जाताना दिसले. पथकाने संशयिताचा पाठलाग करत त्यांना पकडले.

दुचाकीबाबत विचारले असता भाजी मार्केट येथून दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यांची अधिक चौकशी केली असता ओझर, शहापूर, ठाणे येथून सात दुचाकींची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 मार्च रोजी विशेष मोहीमेचे आयोजन

मनमाड नांदगाव रोडवरील किर्तीनगर येथून दुचाकी जप्त केल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारवाई आली. हे संशयित ग्रामीण भागात दुचाकींची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले. संशयितांकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790