त्र्यंबकेश्वर देवस्थानातील घटनेची दंडाधिकारीय चौकशी सुरू -उपविभागीय दंडाधिकारी डाॅ. जी. व्ही. एस. पवनदत्ता

नाशिक। दि. ९ मार्च २०२६: त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे दिनांक 1 मार्च, 2026 रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने दंडाधिकारीय चौकशी सुरू करण्यात आली असून, या संदर्भातील माहिती, तक्रारी तसेच पुरावे ज्या नागरिक व भाविकांकडे असतील त्यांनी पुढील तीन दिवसांच्या आत सादर करावेत, असे आवाहन त्र्यंबकेश्वर–इगतपुरी उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ. जी. व्ही. एस. पवनदत्ता यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

या घटनेबाबत प्राथमिक चौकशीदरम्यान गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था तसेच भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत काही बाबी पुढील सखोल तपासासाठी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे या संदर्भातील सर्वंकष माहिती संकलित करण्यासाठी दंडाधिकारीय चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या चौकशीस पूरक ठरणारी कोणतीही माहिती, तक्रार किंवा संबंधित पुरावे (फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे आदी) ज्या नागरिक तसेच भाविकांकडे असतील त्यांनी ती तीन दिवसांच्या आत सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

सदरची माहिती ई-मेलद्वारे sdoigatpuri.trimbak@gmail.com या पत्त्यावर पाठविता येईल. तसेच अधिक माहितीसाठी 9421550852 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही उपविभागीय दंडाधिकारी, त्र्यंबकेश्वर–इगतपुरी उपविभाग डाॅ. पवनदत्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790