नाशिक: खाजगी बसेस व वाहनांनी जास्त भाडे आकारणी केली तर या नंबरवर करा तक्रार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): खाजगी प्रवासी बस व वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसारच भाडे आकारणी करावी, असे आवाहन नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पूजा आंबेकर खूनप्रकरणी दीराला फाशीची शिक्षा; ३५ वार करून केली होती हत्या

भाडे आकारणी बाबत 27 एप्रिल, 2018 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.  या शासन निर्णयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विविध संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेण्यात आले आहेत. त्यानुसार खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्क्यापेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वर दर्शनाहून परतताना इर्टिगा कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, सहा जखमी

शासन निर्णयानुसार निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने भाडे आकारणी केल्यास किंवा प्रवास करतांना येणाऱ्या अडचणींची तक्रार प्रवाशांनी 0253-222005 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा rto.15-mh@gov.in  या ई-मेल आयडीवर नोंदवावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी  यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790