28 ऑगस्ट 2025
आजचे पंचांग: आज २८ ऑगस्ट २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी संध्याकाळी ५ वाजून ५६ मिनिटांपर्यंत राहील; त्यानंतर षष्टी तिथी सुरु होईल. आज चित्रा नक्षत्र जागृत असणार आहे आणि शुक्ल योग जुळून येणार आहे. आज राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज ऋषिपंचमी असणार आहे. तर ऋषिपंचमी तुमच्या राशीसाठी कशी जाणार जाणून घेऊया…
मेष राशी:
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हाला जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील गोष्टींमध्ये लक्ष द्या. कामात गडबड करू नका नाहीतर चूक होऊ शकते. घरी पाहुणे येणार आहेत त्यामुळे आनंद वाढेल. सगळे लोक कामात व्यस्त असतील. तुम्ही तुमच्या आईला तिच्या माहेरच्या लोकांना भेटायला घेऊन जाऊ शकता. जर तुमचा कोणाशी वाद चालू असेल तर तो मिटण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी:
आज तुम्ही नवीन गोष्टी करून नाव कमवू शकता. ठरवलेल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा फायदा होईल. तुमचा मान-सन्मान वाढेल त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. तुमच्या कामाशी संबंधित काही समस्या आज सुटू शकतात. मात्र कोणतीही प्रॉपर्टी घेताना ती व्यवस्थित तपासा. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. तुमच्या एखाद्या चुकीची शिक्षा तुम्हाला आज भोगावी लागू शकते.
मिथुन राशी:
आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला शॉपिंगला घेऊन जाऊ शकता. त्यामुळे तुमचा खर्च वाढेल. मुले पण गिफ्ट मागू शकतात. मात्र विचारपूर्वक पैसे गुंतवा नाहीतर नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांचा विश्वास जिंकाल. कोणी काही बोलले तर लगेच विश्वास ठेवू नका. त्यामुळे तुमचे भांडण होऊ शकते. तुमच्या व्यवसाय योजनांना गती मिळेल.
कर्क राशी:
आज तुम्हाला अभ्यास करायला आवडेल. पैशांच्या बाबतीत जरा जपून राहा. ऑफिसमध्ये चांगले काम करून तुम्ही नाव कमवाल. तुम्हाला मोठे ध्येय मिळवायचे आहे. प्रेमामुळे मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे जरा सांभाळून राहा. तुम्हाला एखादी प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगले मार्ग मिळतील. त्यांना परदेशातून ऑफर येऊ शकतात. बिझनेस करणाऱ्यांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे.
सिंह राशी:
आज तुम्ही धार्मिक कामात भाग घेऊन नाव कमवू शकता. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमच्या क्षमतेनुसार काम मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. जे लोक प्रेम करतात ते आज आपल्या पार्टनरवर नाराज होऊ शकतात. कामात व्यस्त असल्यामुळे तुम्ही काही महत्त्वाची कामे विसरू शकता. त्यामुळे तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो.
कन्या राशी:
आज तुम्ही नवीन काम सुरू करू शकता, दिवस चांगला आहे. व्यवसाय करताना डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकता. लहान मुले खूप मजा करतील.
तुळ राशी
आज जास्त उत्साहात येऊन कोणतेही काम करू नका. जर तुम्ही व्यवसायात कोणाकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर ते टाळा. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. ऑफिस मध्ये तुमच्या बॉसने तुम्हाला काही काम सांगितले तर ते लक्ष देऊन करा. नाहीतर तुमच्याकडून चूक होऊ शकते. आज खूप दिवसांनी तुमच्या जुन्या मित्राशी भेट होईल. तुम्ही नवीन गाडी घरी आणू शकता.
वृश्चिक राशी:
आज तुम्ही नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकता. मित्रांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल. आज तुमच्या मुलांना काही वाईट बातमी मिळू शकते. मात्र तुम्ही तुमच्या आई-वडिलांचे कर्तव्य पूर्ण करत त्यांना साथ द्याल त्यामुळे मुलांना आनंद होईल. ऑफिस मध्ये तुम्हाला काही टेन्शन असेल तर ते दूर होईल.
धनु राशी:
आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कोणतेही धोकादायक काम करू नका नाहीतर त्रास होऊ शकतो. जे लोक नोकरी करतात त्यांना प्रमोशन मिळू शकते. ऑफिस मध्ये काही धोकेबाज लोकांपासून तुम्हाला सावध राहावे लागेल. ते तुमच्या कामात अडथळा आणू शकतात. कोणत्याही महत्त्वाच्या कामात तुम्हाला धैर्य ठेवावे लागेल तेव्हाच ते पूर्ण होईल. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
मकर राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांची मदत मिळेल. जर कुटुंबात काही वाद असतील तर ते घराबाहेर कोणाला बोलू नका. पैशांच्या व्यवहारात जरा जपून राहा. कायद्याशी संबंधित तुमचे काही काम पूर्ण होऊ शकते त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही मित्रांसोबत मनोरंजन कार्यक्रमात भाग घेऊ शकता. तुमच्यामध्ये मदतीची भावना राहील. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल तर त्याचा निकाल आज येऊ शकतो.
कुंभ राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. तुम्हाला सुखसोयी मिळतील. तुमच्या ऊर्जेचा वापर चांगल्या कामांसाठी करा ते तुमच्यासाठी चांगले राहील. कोणाशीही अहंकाराने बोलू नका. जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना त्यांच्या मित्रांकडून चांगली ऑफर मिळू शकते. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील लोकांसमोर तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल त्यामुळे तुमचा मानसिक तणाव कमी होईल.
मीन राशी:
आजचा दिवस तुमच्यासाठी जबाबदारीचा आहे. जे लोक राजकारणात काम करतात त्यांच्यावर कामाचा जास्त भार राहील त्यामुळे ते थोडे चिंतेत राहतील. नातेवाईकांकडून तुम्हाला मदत मिळेल. तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत बुद्धी वापरून काम करावे लागेल तेव्हाच तुम्हाला यश मिळेल. तुम्ही लोकांच्या भल्यासाठी काम कराल आणि धार्मिक कामांमध्ये तुम्हाला आवड निर्माण होईल. सरकारी कामे काळजीपूर्वक करा नाहीतर तुमच्याकडून चूक होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी नाशिक कॉलिंग केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून नाशिक कॉलिंग कोणताही दावा करत नाही.)