टकले सराफाला २६ लाखांचा गंडा

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : शहरातील प्रख्यात टकले सराफ यांची व्यवसायात सुमारे २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सन २०१० ते २०२० या दहा वर्षांच्या काळात ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफी व्यावसायिक गिरीश सदाशिव टकले यांच्या तक्रारीन्वये संजय सहादु झोमन (रा. सागरसंगम अपार्टमेंट, राऊ हॉटेलजवळ, पेठरोड), योगेश ईश्वर अधिकार (रा. गोदावरी हाईटस्, खोडे मळा, अशोका मार्ग) यांच्याविरुद्ध भादंवि कायदा कलम ४२०, ४०९, ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. टकले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांनी दहा वर्षात कर्मचारी म्हणून २६ लाख, ५० हजार ९७७ रुपये किंमतीचे सोने दुकानात जमा न करता फसवणूक केली. 

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here