नाशिक शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच

नाशिक – (विशेष प्रतिनिधी): लॉकडाऊननंतर शहरातील व्यवहार तसेच जनजीवन पूर्ववत होत असतानाच गुन्हेगारीही वाढू लागली आहे. घरफोडी, जबरी चोरी, हाणामारीच्या घटना घडल्यानंतर वाहन चोरीच्या घटना पुन्हा सुरु झाल्या आहेत.

गुरुवारी चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. किरण निवृत्ती उगले (रा. श्रीकृष्ण कॉलनी, दत्तमंदिर, नाशिकरोड) यांची तीस हजार रुपये किंमतीची होंडा शाईन मोटारसायकल (एमएच १५ – एफडब्ल्यू ५०२३) घरासमोरुन चोरीस गेली. सचिन सुरेश पाटील (रा. विठ्ठल सोसायटी, इंदिरानगर) यांची मोटारसायकल (एमएच १५ – एवाय ३८९०) पार्किंगमधून चोरीला गेली. निळकंठ दत्ताराव सानप (रा. अनमोल रेसीडेन्सी, दत्तनगर, आडगाव) यांची ड्रीम युगा मोटारसायकल (एमएच १५ – डीआर ४४५०) घराजवळून चोरीला गेली. रविंद्र केवळ मांडवडे (रा. शिवशक्ती कॉलनी, ध्रुवनगर) यांची ॲक्टीवा मोपेड (एमएच १५ – जीजे २८९६) आनंदवल्ली परिसरातील दिवट्या बुधल्या हॉटेलसमोरुन चोरीला गेली. 

Loading

हे ही वाचा:  नाशिक: अवैध सावकार वैभव देवरेने ४ लाख रुपयांचे उकळले २८ लाख; १८ पर्यंत पोलिस कोठडी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790