नाशिक: PhonePe द्वारे अशी केली गेली या व्यापाऱ्याची दीड लाखाची फसवणूक

नाशिक: PhonePe द्वारे अशी केली गेली या व्यापाऱ्याची दीड लाखाची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): PhonePe द्वारे व्यापाऱ्याची केली दीड लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

ढवळेश्‍वर (ता. मालेगाव) येथील प्रशांत खैरनार (वय ३१) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

या व्यापाऱ्याची दुकानावर खरेदीसाठी आलेल्या अनोळखी ग्राहकाने मोठ्या हातचलाखीने क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी मोबाईल घेऊन स्वत:च्याच फोन पे वर दीड लाख रुपये टाकून घेत फसवणूक करण्याचा आगळावेगळा प्रकार घडला.

हे ही वाचा:  बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिका जखमी

या प्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री. खैरनार यांचे लखमापूर येथे साई ॲग्रो सर्व्हीसेस हे ड्रीप इरीगेशन व पीव्हीसी पाईप विक्रीचे दुकान आहे. संबंधित ग्राहकाने श्री. खैरनार यांच्याकडून पीव्हीसी पाईप खरेदी करावयाचे आहेत, असे सांगून त्यांचा मोबाईल घेत फसवणूक केली. २० जानेवारीला सकाळी हा प्रकार घडला.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध

त्यांचा मोबाईल क्रमांकावर फोन पे वर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी क्युआर कोड वापरुन स्कॅन करण्यास सांगून त्यांचा मित्र साक्षीदार प्रमोद सोनवणे यांचे मोबाईल क्रमांक ९२८४९०९०२१ वरील फोन पे मोबाईलवरुन दीड लाख रुपये ऑनलाइन त्याच्या फोन पे वर ट्रान्स्फर करुन फसवणूक केली. श्री. खैरनार यांच्या तक्रारीवरुन सटाणा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790