नाशिकमध्ये आता सायंकाळीही घंटागाडी कचरा संकलन करणार  !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): ३५४ कोटी रुपये खर्च करून शहरातील केरकचरा संकलनासाठी दिलेला ३९६ घंटागाड्यांचा ठेका वादात असताना, आता घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छ शहर स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तसेच घंटागाडीच्या ठेक्याविषयी तक्रारी दूर करण्यासाठी सायंकाळी १० अतिरिक्त घंटागाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या घंटागाड्या कामगार वस्ती तसेच व्यावसायिक संकुल परिसरामध्ये रात्रीच्या वेळी फिरून कचरा संकलन करणार आहे.

शहरामधील साडेपाच लाख मिळकती तसेच व्यापारी व औद्योगिक आस्थापनांमधून मोठ्या प्रमाणामध्ये रोज कचरा निर्मिती होत असते. हा कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने शहरांमधील सहाही विभागांमध्ये खासगीकरणांमधून‎घंटागाडीचा ठेका दिला आहे. जवळपास ३९६ घंटागाडी‎कचरा संकलनासाठी उपलब्ध असून सकाळी ८ ते‎दुपारी १२ या कालावधीमध्ये कचरा संकलित करून या‎घंटागाड्या पाथर्डी खत प्रकल्पावर प्रक्रियेसाठी नेतात.‎ येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करून खत‎तसेच इंधन विटा तयार केल्या जातात.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

या संपूर्ण‎प्रक्रियेसाठी पाच वर्षाकरिता ३५४ कोटी रुपयांचा खर्च‎आहे. इतका खर्च करूनही शहरांमधील‎ अस्वच्छता कायम असल्याचे तक्रारी नागरिकांमधून येत‎आहे. लहान गाड्यांमधून कचरा वाहतूक करताना‎ओला व सुका कचरा विलगीकरणाच्या अटीचे‎उल्लंघन होत आहे. ही बाब लक्षात घेत आता‎ सायंकाळीदेखील अतिरिक्त नऊ घंटागाड्यांद्वारे कचरा‎संकलन करण्याचा निर्णय घनकचरा व्यवस्थापन ‎विभागाने घेतला आहे.‎

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

विभागनिहाय अतिरिक्त घंटागाड्या अशा:
नवीन नाशिक- २, नाशिक पूर्व- २, नाशिकरोड- १, नाशिक पश्चिम- २, पंचवटी विभाग- १, सातपूर विभाग- १

कचऱ्याचे ब्लॅकस्पॉट होणार‎ आता दूर‎​​​​​​​:
कामगार वस्तीत बरेचसे कामगार हे शिफ्ट पद्धतीने रोजगारासाठी सातपूर, अंबड येथील एमआयडीसी तसेच शहरातील बांधकाम साइटवर जातात. हे कामगार सकाळी ७ ते ८ वाजता घराबाहेर पडून रात्री उशिरा घरी परततात. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये न जाता जवळच्या ब्लॅकस्पॉटवर कचरा टाकला जातो. याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. ही बाब लक्षात घेत सायंकाळी घंटागाड्या सुरू केल्यामुळे संबंधितांना कचरा टाकणे सोपे होईल.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

दिवाळीत शहरात दोन‎वेळा कचरा संकलन‎:
दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये‎कचरा निर्मिती होत असल्यामुळे‎गतवर्षीप्रमाणे यंदाही सकाळ आणि‎संध्याकाळ अशा दोन सत्रात‎घंटागाडीद्वारे घरोघरी तसेच‎बाजारपेठांमध्ये कचरा संकलन‎करण्याचे नियोजन सुरू आहे. ‎दिवाळी सणाच्या कालावधीत‎घरांची स्वच्छता, रंगरंगोटी असो‎वा फटाक्यांचा कचरा यामुळे‎शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे‎ढीग साचताे, ही बाब लक्षात घेत‎हा आदेश देण्यात आला आहे.‎

दहा घंटागाड्या अतिरिक्त उपलब्ध:
कामगार वस्ती, व्यापारी संकुल, व्यावसायिक आस्थापना या ठिकाणी रात्री कचरा संकलनासाठी दहा अतिरिक्त घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. – डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790