नाशिक (प्रतिनिधी): शहरासह जिल्ह्यात पुढील दोन दिवस वातावरण कोरडे राहणार असल्याने उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर मंगळवार (दि. १) आणि बुधवारी (दि. २) ढगाळ हवामानासह तुरळक पावसाचा अंदाज इगतपुरी भात संशोधन केंद्रातील हवामान विभागाने वर्तविला आहे.
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून कमाल तापमानात घसरण झाली असून किमान तापमान मात्र स्थिर आहे. शुक्रवारी कमाल ३६.४ तर किमान १९.० अंश सेल्सीअसची नोंद करण्यात आली आहे. कोकणात उष्ण व दमट तर पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कोरडे वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यात आगामी दोन दिवस वातावरण कोरडे राहणार असल्याने उन्हाची तीव्रता राहणार आहे.
या दरम्यान वाऱ्याचा वेग हा ताशी २ ते ३ किलोमीटर रहाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी उन्हाची तीव्रता असली तरी कमाल तापमान हे ३६.२ अंश नोंदले गेले. मात्र सांयकाळी उकाड्यामध्ये वाढ झाली असून किमान तापमान हे १९ अंशांवर होते.