नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणार वारे
नाशिक (प्रतिनिधी): राज्यात नाशिकसह ठिकठिकाणी रविवारपासून (दि. २) ५ जूनपर्यंत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून हलक्या ते मध्यम मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण असून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी निम्म्याहून अधिक अरबी समुद्र व्यापला आहे.
नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यांत २ ते ५ जूनदरम्यान तर विदर्भात दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, असून काही ठिकाणी उष्ण वातावरण राहणार आहे. ४ व ५ जूनला रत्नागिरी व सिंधुदुर्ग तर मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790